वृत्तसंस्था/ बेंगळूर
कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या टेनिस कोर्टवर रविवारी येथे झालेल्या महिलांच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत झेकच्या टॉप सीडेड ब्रेन्हा पुव्हर्टोव्हाने एकेरीचे अजिंक्मयपद मिळविताना भारताच्या अंकिता रैनाचा पराभव केला.
टॉप सीडेड ब्रेन्डाने एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंकिता रैनाचा 0-6, 6-4, 6-0 असा फडशा पाडला. या स्पर्धेत अंकिता रैनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या लढतीत अंकिता रैनाने आपल्या वेगवान आणि अचूक सर्व्हिसच्या जोरावर पहिला सेट 6-0 असा एकतर्फी जिंकला होता. पण त्यानंतर पुढील दोन सेट्समध्ये अंकिताला आपली सर्व्हिस अधिक वेळ राखता आली नाही. तसेच ब्रेन्डाच्या वेगवान फटक्मयांना प्रत्युत्तर देता आले नाही. त्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.









