वृत्तसंस्था / वेलिंग्टन (न्यूझीलंड)
न्यूझीलंड क्रिकेटने बुधवारी जाहीर केलेल्या 2025-26 हंगामाच्या यादीत ऑकलंड हार्ट्सची डावखुरी गोलंदाज ब्री इलिंग आणि ओटागो स्पार्क्सची फलंदाज बेला जेम्स यांना त्यांचे पहिले केंद्रीय करार मिळाले आहेत.
इलिंग आणि जेम्स सध्या न्यूझीलंड अ संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहेत. हेली जेम्सन आणि सोफी डेव्हाईन यांनी सोडलेलीरिक्त जागा या जोडीने भरली. जेन्सनने अलिकडेच निवृत्तीची घोषणा केली असताना डेव्हाईनने पुष्टी केली की या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकादरम्यान निचा एक दिवशीय सामायातील शेवटचा डाव असेल आणि कॅज्युअल कराराचा पर्याय निवडला. 21 वर्षीय स्विंग गोलंदाज इलिंगने या वर्षाच्या सुरूवातीला श्रीलंकेविरुद्ध व्हाईट फर्न्ससाठी टी-20 आणि एकदिवशीय सामन्यात पदार्पण केले. तिने गेल्या हंगामात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आणि 21 व्या वर्षी 29 बळी घेत ऑकलंडची सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज म्हणून ती कामगिरी केली. जेम्सने अनेक हंगामांच्या कठोर परिश्रमानंतर तिचा पहिला करार मिळवला. 2014 मध्ये तिने वयाच्या 16 व्या वर्षी स्पार्क्समध्ये पदार्पण केले तेंव्हाच्या जवळपास 10 वर्षानंतर तिला तिचा पहिला आंतरराष्ट्रीय कॉलअप मिळाला. जेम्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख करुन दिली. डिसेंबर 2014 आणि मार्च 2025 मध्ये अनुक्रमे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिचा पहिला एकदिवशीय आणि टी-20 सामने जिंकले.
ब्रीने श्रीलंकेविरुद्ध उत्कृष्ट मालिका खेळली. चमारी अटापट्टू सारख्या जागतिक दर्जाच्याफलंदाजांविरुद्ध तिने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यावरुन ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार असल्याचे दिसून येते, असे न्यूझीलंड महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर म्हणाले. असे न्यूझीलंड क्रिकेटने दिलेल्या निवेदनातून उद्धृत केले आहे. बेलाने दांतर्गत स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने उत्तम पदार्पण मालिका खेळली होती. तिच्याकडे अशा क्षमता आहेत ज्या आम्हाला वाटते की ती आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होईल, असे स्वेयर पुढे म्हणाले.
2025-26 साठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या संपूर्ण यादीत सुझी बेट्स, एडन कार्सन, लॉरेन डाऊन, इझी गेझ, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, ब्री इलिंग, पॉली इंग्लिस, बेला जेम्स, जेस केर, मेली केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रो, ली ताहुहू यांचा समावेश आहे.









