नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नौदलाच्या अनेक जुन्या प्रथांना सध्या फाटा दिला जात आहे. भारतीय संरक्षण विभागाच्या पुढाकाराने जुन्या प्रथांमध्ये परिवर्तन करण्याचे कार्य हाती घेण्यात आले। आहे. त्यानुसार आता नौदलाच्या युद्धनौका किंवा इतर नौकांमध्ये प्रवेश करणाऱया महिलांना सरसकट सॅल्यूट केला जाणार नाही. केवळ ज्या महिलांना असा सॅल्यूट स्वीकारण्याचा नियमाप्रमाणे अधिकार आहे, त्यांनाच सॅल्यूट केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. असा सॅल्यूट करण्यासाठी नौकांवर विषेश नौसैनिक नियुक्त केलेले असतात. त्यांना ‘गँगवे स्टाफ’ म्हणतात.
आतापर्यंतच्या प्रथेनुसार सरसकट नौकेवर येणाऱया कोणत्याही महिलेला सॅल्यूट केला जातो. मात्र यापुढे केवळ नौदलाच्या वरीष्ठ अधिकाऱयांच्या पत्नी, किंवा महतवाच्या अतिथी महिला यांनाच असा सॅल्यूट केला जाईल. ज्या महिलांना हा सॅल्यूट करण्याचा नियम आहे आणि ज्यांना असा अधिकार आहे अशा महिलांनाच हा सॅल्यूट केला जाईल, असे नौदलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.