गगनबावडा- भुईबावडा घाटामध्ये वैभववाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका धबधब्याच्या प्रवाहासोबत वाहत जाऊन एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रोहन यशवंत चव्हाण (वय. २९ रा. कापड पेठ, सांगली) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मित्रांसोबत हा युवक आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बॉडी दरीतून काढण्याचे काम सुरु आहे. याबाबतची माहिती गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी तरुण भारतला दिली आहे.
Previous Articleनवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अशक्य
Next Article कुणी पालकमंत्री देता का…?









