मुंबई: शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची याचिका दाखल केली होती. त्याचे पत्रक घेऊन भाजपचे नेते यांनी रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यपालांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलवत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारची ३० जूनला परीक्षा होणार असून महाविकास आघाडी सरकारला या अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सकाळी ११ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करणार का याकडेच आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Previous ArticleSolapur; विवाहितेची मुलासह पेटवून घेऊन आत्महत्या; घातपातीचा संशय
Next Article राशीभविष्य








