वृत्तसंस्था /लंडन
पॅरीस सेंट जर्मन फुटबॉल क्लब संघातील आघाडी फळीत खेळणारा ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू नेमारबरोबर सौदी अरेबियाच्या अल हिलाल फुटबॉल क्लबने नवा करार केला आहे. सदर माहिती फ्रान्सच्या एका क्रीडा दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या अल हिलाल फुटबॉल क्लबने 31 वर्षीय नेमारबरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. आता बार्सिलोनाच्या पॅरीस सेंट जर्मन फुटबॉल क्लबमधून नेमार आता अल हिलाल क्लबमध्ये दाखल होणार आहे. सौदी अरेबियाच्या अल हिलाल फुटबॉल क्लबने या करारापोटी नेमारला 244 दशलक्ष डॉलर्सची रक्कम देणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड फुटबॉल संघाचा कर्णधार हॅरी केनने बायर्न म्युनिच क्लबशी नवा करार केला आहे. गेल्या शनिवारी 30 वर्षीय हॅरी केन आणि बायर्न म्युनिच यांच्यात 4 वर्षांचा करार झाला असून या करारापोटी बायर्न म्युनिचला 109.44 दशलक्ष डॉलर्स मोजावे लागणार आहेत.









