ब्युनोस आयरीस/ वृत्तसंस्था
ब्राझीलचा 18 वर्षीय नवोदित युवा टेनिसपटू जोआवो फोन्सीकाने एटीपी टूरवरील येथे झालेल्या 250 दर्जाच्या अर्जेंटिना खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात फोन्सीकाने अर्जेंटिनाच्या सेरूनडोलोचा 6-4, 7-6 (7-1) असा पराभव केला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील फोन्सीकाचे हे पहिले विजेतेपद आहे. ही स्पर्धा क्लेकोर्टवर खेळविली गेली. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत फोन्सीकाने रशियाच्या नव्या मानांकीत रूबलेव्हला पराभवाचा धक्का दिला होता. आता पुढील आठवड्यात ब्राझीलमध्ये होणाऱ्या रिओ खुल्या एटीपी टेनिस स्पर्धेत फोन्सीका सहभागी होत आहे.









