वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस या क्रीडा प्रकारात पुरूष एकेरीत आशिया किंवा युरोपच्या बाहेरील देशातून उपांत्य फेरीत प्रवेश करणारा ब्राझीलचा टेबल टेनिसपटू हुगो कॅलेडिरेनो हा पहिला खेळाडू आहे.
ब्राझीलच्या कॅलेडिरेनोने पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जेंग जिनचा 4-0 असा पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूंत स्थान मिळविले. आता इजिप्तचा ओमर असार व कॅलेडिरेनो यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.









