वृत्तसंस्था / सॅन जोस (कॅलिफोर्निया)
येथे मंगळवारी झालेल्या पहिल्या प्रदर्शनिय महिलांच्या फुटबॉल सामन्यात ब्राझीलने अमेरिकन फुटबॉल संघाचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला. 2014 नंतर ब्राझील महिला संघाने अमेरिकेवर मिळविलेला हा पहिला विजय आहे.
गेल्या उन्हाळी मोसमात झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या फुटबॉल प्रकारात सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत अमेरिकन महिला फुटबॉल संघाने ब्राझीलचा 1-0 असा निसटता पराभव करुन अजिंक्यपद मिळविले होते. मंगळवारी झालेल्या सामन्यात 34 व्या सेकंदाला कॅटरिना मॅकेरिओने अमेरिकेचे खाते उघडले. मॅकेरिओचा हा आंतरराष्ट्रीय सामन्यातील दहावा गोल होता. ब्राझीलतर्फे अमंदा ग्युटेरीसने स्टॉपेज कालावधीत आपल्या संघाचा दुसरा आणि निर्णायक गोल केला.









