वृत्तसंस्था/ लंडन
सोमवारी येथे झालेल्या विश्व स्नूकर चॅम्पियनशिप स्पर्धेचे अजिंक्यपद बेल्जियमच्या लुका ब्रेसिलने पटकावले. ब्रेसिलने अंतिम लढतीत आतापर्यंत चारवेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मार्क सेलबायचा 18-15 असा पराभव केला.
आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात 1980 साली कॅनडाच्या क्लिफ थोरबर्न, 1997 साली आयर्लंड प्रजासत्ताकच्या केन डुहेर्टीने तर 2010 साली ऑस्ट्रेलियाच्या निल रॉबर्टसनने विजेतेपद मिळवले होते.









