Brahmanand Padalkar Sangli News : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील अमर टॉकीजसमोर असलेल्या मिळकती संदर्भात मालकी हक्काचे कागदपत्र सादर करण्यासाठी दोन्ही दावेदारांना एक आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.आता या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरूवारी 19 तारखेला होणार आहे.बुधवारी सकाळी तहसिलदारांसमोर या प्रकरणाची दुसरी सुनावणी झाली.ब्रम्हानंद पडळकर यांनी वकीलांची नियुक्ती केली असून,कोणत्याही प्रकारे एकतर्फी निर्णय होऊ नये म्हणून पडळकर वकीलांकडून न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, बुधवारच्या सुनावणीस कब्जेधारकांपैकी चारजण गैरहजर होते.
ब्रम्हानंद पडळकर यांच्या वतीने अॅड.एच.आर.मुल्ला,अॅड.एस.डी.मुजावर,अॅड.एस.जी.मालगांवकर यांनी तर कब्जेधारकांच्या वतीने अॅड.ए.ए.काझी,अॅड.समीर हंगड,अॅड.नितीन माने यांनी बाजू मांडली. दोन्ही गटाकडे जागेच्या मालकीबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नव्हती. तर कब्जेधारकांनाही कागदपत्रे मिळविण्यास अडचणी येत असल्याचे कारण सांगून दोन्ही गटाच्या वकीलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली.यावर तहसिलदारांनी आठवडाभराची मुदतवाढ देऊन पुढील सुनावणी गुरूवारी 19 जानेवारी रोजी घेणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेशही दिले.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील अमर टॉकीजसमोर असलेली वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी पोकलॅनच्या माध्यमातून दहा दुकाने रातोरात उध्दवस्त करण्यात आली होती.आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणांच्या जमावाने ही तोडफोड केल्याचा आरोप आहे.आता जागा मालकीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले असून,दोन्ही गटाकडून न्यायालयीन प्रक्रिय सुरु झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









