दाबोळी विमानतळावर आमदार व शिष्य-अनुयायींद्वारे जल्लोषात स्वागत.
दाबोळी : काउंसिल फॉर युनिव्हर्सल पीस – दुबई संस्थेकडून जागतिक शांती दिनादिवशी ग्लोबल पीस अवॉर्ड गोव्यासाठी मिळाला. खूप आनंद वाटतो की गोव्याची भूमी सर्व धर्माच्या लोकांचे अस्तित्व सांभाळत आहे आणि सुरु असलेले कार्य देश विदेशात मान्यकेले जात आहे. सगळीकडे युद्धसदृश्य गोष्टी घडत आहेत त्यासाठी आम्ही आपली संस्कृती सर्वांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. शांती प्रीय लोकांनी हा विषय हातात घेतला तर जगात शांती निर्माण होऊ शकते. सर्वांनी देवावर विश्वास ठेवून समाजात शांती निर्माण करण्याचे काम केले पाहिजे. असे संबोधन पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींनी प्रतिनिधींशी बोलताना केले.
दि. 21 सप्टेंबर रोजी विश्व शांती दिन निमित्ताने जातीयवाद थांबवा आणि शांतता स्थापित करा या घोषवाक्मयाखाली काउंसिल फॉर युनिव्हर्सल पीस या संस्थेद्वारे विश्व शांती संमेलन 2022 चे आयोजन वर्ल्ड टेड सेंटर, दुबई येथे करण्यात आले होते.या सम्मेलनात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती, एकता व मानवतेसाठी केलेल्या क्रांतिकारक दिव्य कार्याची दखल घेऊन सद्गुरु ब्रह्म?शानंदाचार्य स्वामीजींना विश्वशांती पुरस्कार दुबईचे शेख उबील अल मक्त?म ह्यांच्या हस्ते बहाल करुन गौरवान्वति करण्यात आले होते.
आज दि. 12 ऑक्टोबर रोजी पूज्य स्वामीजींचे गोवा दाबोळी विमानतळावर आगमन झाले. दरम्यान मोठय़ासंख्येने शिष्य-अनुयायी स्वागतासाठी उपस्थित होते.
याप्रसंगी मडगांवचे आमदार दिगंबर कामत, वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर, इंटरनॅशनल सद्गुरु फाउंडेशन सचिवा . ब्राह्मीदेवीजी, तसेच श्री दत्त पद्मनाभ पीठाचे संचालक मंडळ, प्रबंधक व कृपाकांक्षी उपस्थित होते.









