वार्ताहर /उचगाव
सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने कल्लेहोळ हायस्कुल येथे आयोजित उचगांव विभागीय व निर्मलनगर मोदगा येथे आयोजित तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत ब्रह्मलिंग हायस्कूलच्या मुला-मुलींच्या संघांनी दुहेरी मुकुट पटकाविले. 14 वर्षांखालील वैयक्तिक क्रीडा प्रकारात अदिती कदम गोळाफेक प्रथम, श्रेया कलखांबकर अडथळा शर्यतीत द्वितीय, 17 वर्षांखालील वैयक्तिक गटातील स्पर्धेत 100 मी. धावणे आदर्श कदमने द्वितीय, राज यमोजीकर 200 मी. धावणे द्वितीय, रोहन पाटील 400 मी. द्वितीय, विनय पाटील 3000 मी. धावणे तृतीय, रिलेमध्ये राज यमोजीकर, सक्षम पाटील, रोहन पाटील, आदर्श कदमने द्वितीय क्रमांक पटकाविला. गोळाफेक राज रामोजीकरने तृतीय, आदर्श कदम उंचउडी द्वितीय, विनय पाटील तृतीय, गोळाफेकमध्ये आदिती कदमने द्वितीय, थाळीफेकमध्ये ऐश्वर्या अनसुऊकरने द्वितीय, 4×100 मी. रिलेमध्ये रिया चौगुले, हुवाक्का जाधव, रेश्मा लोहार, प्रतिक्षा कलखांबकरने प्रथम क्रमांक तर रिया चौगुलेने 100 मी. धावणे प्रथम, हुवाक्का जाधवने 800 मी, धावणे प्रथम, हुवाक्का जाधवने 1500 मी धावणे प्रथम, रोहिणी पाटीलने लांबउडीत तृतीय क्रमांक मिळविला. यांना शाळेचे मुख्याद्यापक एन. के. चौगुले आणि शारिरीक शिक्षक पी. बी. गोरल आदींचे मार्गदर्शन लाभले.









