वृत्तसंस्था/ लाहोर
न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी वनडे आणि टी-20 मालिकांसाठी पीसीबीने पाक संघाची तसेच प्रशिक्षक वर्गाची घोषणा केली आहे. या आगामी मालिकांसाठी पाक क्रिकेट संघाच्या हंगामी प्रमुख प्रशिक्षकपदी ग्रँट ब्रॅडबर्न यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या आगामी मालिकांसाठी पाकचे नेतृत्व बाबर आझमकडे सोपवण्यात आले असून शदाब खान उपकर्णधार म्हणून राहिल. न्यूझीलंड आणि पाक यांच्यात पाच सामन्यांची टी-20 तसेच पाच सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना 14 एप्रिल रोजी लाहोरमध्ये होणार आहे. पाक संघाच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी अब्दुल रेहमानची नियुक्ती करण्यात आली असून अँड्य्रू पुटीक आणि उमर गुल हे अनुक्रमे फलंदाज आणि गोलंदाज प्रशिक्षक म्हणून राहतील. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिका झाल्यानंतर पाक संघासाठी कायमस्वरुपी प्रशिक्षकाची घोषणा पीसीबी करणार आहे. हंगामी प्रमुख प्रशिक्षक ब्रॅडबर्न तसेच साहाय्यक प्रशिक्षक पुटीक यांचे 11 एप्रिलला लाहोरमध्ये आगमन होईल.

पाक टी-20 संघ : बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), झमान खान, हॅरीस रौफ, फईम अश्रफ, एहसानउल्ला, इमाद वासीम, सईम अयुब, मोहमद हॅरीस, मोहमद नवाज, नसीम शहा, फक्र झमान, शाहीन आफ्रिदी, शान मसूद, मोहमद रिझवान आणि इफ्तिकार अहमद.
पाक वनडे संघ : बाबर आझम (कर्णधार), शदाब खान (उपकर्णधार), हॅरीस रौफ, एहसानउल्ला, इमाम उल हक, हॅरीस सोहेल, मोहमद रिझवान, अब्दुल्ला शफीक, फक्र झमान, शाहीन आफ्रिदी, उस्मा मीर, मोहमद नवाज, नसीम शहा, सलमान अली आगा, शान मसूद, मोहमद वासीम ज्युनियर.
न्यूझीलंड टी-20 संघ- टॉम लॅथम (कर्णधार), चॅपमन, मॅट हेन्री, कोले मॅकोन्ची, मिचेल, रचिन रविंद्र, इश सोधी, यंग, बोवेस, क्लेव्हर, लिस्टेर, मिलेनी, निशम, सिप्ले आणि टिकनेर. न्यूझीलंड वनडे संघ : टॉम लॅथम (कर्णधार), निकोल्स, ब्लंडेल, कोले मॅकोन्ची, मिचेल, रचिन रविंद्र, इश सोधी, यंग, बोवेस, लिस्टेर, मिलेनी, निशम,सिप्ले आणि टिकनेर.









