हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट तिसऱ्यांदा विवाह करण्याच्या तयारीत आहे. वयाच्या 61 व्या वर्षी तो स्वत:च्या जीवनाला नवी दिशा देणार आहे. अभिनेत्याने अलिकडेच स्वत:ची प्रेयसी इनेस डी रामोन यांना प्रपोज केले आहे. 32 वर्षीय रामोन ज्वेलरी डिझाइनर आहे. दोघेही 2022 पासून एकमेकांना डेट करत आहेत. ब्रॅड पिटने 6 आठवड्यांच्या चित्रिकरणासाठी न्यूझीलंडला जाण्यापूर्वी इनेस डी रामोनला विवाहासाठी प्रपोज केले आहे. रामोन देखील घटस्फोटित आहे. तिने 2022 मध्ये द वॅम्पायर डायरीज फेम पॉल वेस्लेसोबतच्या विवाहाच्या तीन वर्षांनी घटस्फोट घेतला होता.
ब्रॅड पिट हा अँजेलिना जोलीसोबतच्या घटस्फोटानंतर नवी सुऊवात करू पाहत आहे. ब्रॅड पिटचा हा तिसरा विवाह असणार आहे. ब्रॅडने सर्वप्रथम अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनसोबत 2000 साली विवाह केला होता.









