वृत्तसंस्था / दुबई
न्यूझीलंडचा अष्टपैलु मिचेल ब्रेसवेलच्या आयसीसी वनडे अष्टपैलुंच्या मानांकन यादीत सुधारणा झाली असून त्याचे स्थान दोन अंकांनी वधारले आहे. पाकबरोबर झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ब्रेसवेलने अष्टपैलु कामगिरीचे दर्शन घडविले. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ब्रेसवेलने 85 धावा झोडपल्या तर या मालिकेत त्याने दोन गडी बाद केले. अष्टपैलुंच्या ताज्या मानांकन यादीत ब्रेसवेल आता पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटेनर सहाव्या स्थानावर आहे.
आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताच्या शुभमन गिलने आपले अग्रस्थान कायम राखले असून पाकचा बाबर आझम दुसऱ्या तर भारताचा कर्णधार रोहीत शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. पाकचा कर्णधार मोहम्मद रिझवान 21 व्या स्थानावर आहे.









