बेलफास्ट : बुधवारी येथे झालेल्या दुसऱया टी-20 सामन्यात फिरकी गोलंदाज मायकेल ब्रेसवेलची शानदार हॅट्ट्रीक व डेन क्लीव्हरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर न्युझीलंडने यजमान आयर्लंडचा 88 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 4 बाद 179 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 13.5 षटकात 91 धावात आटोपला.









