आगामी पाच वर्षांमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
नवी दिल्ली
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) पुढील पाच वर्षांमध्ये ‘प्रोजेक्ट अॅस्पायर’ या उपक्रमावर सुमारे 1.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. सदरची माहिती बीपीसीएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी कृष्णकुमार यांनी कंपनीच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सांगितली आहे.
ऑईल मार्केटिंग कंपनी केवळ प्रोजेक्ट अॅस्पायर अंतर्गत आपला तेल व्यवसाय वाढवेल. आपल्या अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओचाही विस्तार करणार आहे. कंपनीने 2040 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले असल्याचेही सांगितले आहे.
1.5 लाख कोटी रुपयांचा नियोजित भांडवली खर्च
कृष्णकुमार यांनी बैठकीत सांगितले, ‘कंपनीने पुढील पाच वर्षांमध्ये सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचा नियोजित भांडवली खर्च (कॅपेक्स) करण्याचे निश्चित केले आहे. या गुंतवणुकीमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वीचे संरक्षण करत आपला व्यवसाय अधिक सक्षम करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.’
ग्रीन हायड्रोजन, कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जा कार्यक्षमता सुधारणे यासह प्रकल्पांसाठी बीपीसीएल आत्ता ते 2040 दरम्यान 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असेही कृष्णकुमार म्हणाले.
कॅप्टिव्ह विंड एनर्जी प्लांट उभारण्यासाठी 10 लाख कोटींची गुंतवणूक
बीपीसीएल त्याच्या 240,000 बॅरल प्रतिदिन मुंबई रिफायनरी आणि मध्य भारतातील बिना रिफायनरीसाठी 50 मेगावॅट कॅप्टिव्ह विंड पॉवर प्लांट उभारण्यासाठी 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
2025 पर्यंत 1 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि 2040 पर्यंत 10 गिगावॅट क्षमता गाठण्याची कंपनीला आशा आहे. कृष्णकुमार म्हणाले की बीपीसीएलमध्ये भारत ओमान रिफायनरीजच्या विलीनीकरणामुळे कंपनीच्या शुद्धीकरण क्षमतेला लक्षणीय चालना मिळाली आहे.









