बाळेकुंद्री : पाण्यात पोहताना डोक्याला दगड लागल्याने एका सोळा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मारकट्टी क्रॉसजवळील सिद्धनकोळ येथे घडली.
कृष्णा बसवराज हणबारा (वय १६, रा. मास्तमर्डी ) असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते सिद्धनाबावी कोल येथे पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान पोहताना दगड डोक्यात आदळल्याने कृष्णा गंभीर जखमी होऊन पाण्यात बुडाला आणि त्याचा यातच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास सुरु आहे.