मुंबई
आता ‘सन ऑफ सरदार २’ ची रिलीज डेट समोर आली आहे. या सिक्वेलमध्ये अजय देवगण सोबतच मृणाल ठाकूर. संजय दत्त आणि रवि किशन अशा मोठी स्टार कास्ट दिसणार आहे. हा सिनेमा २५ जुलै २०२५ ला प्रदर्शित होणार असून त्याच दिवशी सिद्धार्थ मल्होत्राचा ‘परम सुंदरी’ सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राची बॉक्स ऑफीसवर खऱ्या अर्थाने टक्कर होणार आहे. बॉक्स ऑफीस बाजी कोण मारणार आता हे पहावे लागेल.
अभिनेता अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ हा सिनेमा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर सुपरहीट ठरला होता. अॅक्शन आणि कॉमेडी चे कॉम्बिनेशन असणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अश्विनी धीर यांनी केले होते. २०१२ मध्ये या सिनेमाने १३५ कोटींचा बिझनेस केला होता.
अजय देवगणचे ‘सन ऑफ सरदार’ सोबत आणखी बरेच सिनेमे २०२५ मध्ये येत आहेत. १७ जानेवारीला ‘आझाद’ प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून रविना टंडनची मुलगी रशा थडानी आणि अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण हे पदार्पण करत आहेत. यासोबत ‘रेड २’ हा सिनेमा १ मे रोजी येत आहे, तर वर्षाअखेरीस म्हणजेच १४ नोव्हेंबरला ‘दे दे प्यार दे’ चा सिक्वेल येऊ घातला आहे.
‘परम सुंदरी’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा सोबत जान्हवी कपूर ही मुख्य भूमिकेत असणार आहे. तर तुषार जलोटा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Previous Articleस्वयंसहाय्य्य गटांना अपघाती निधन विमा
Next Article बांदा उपसरपंचपदी आबा धारगळकर बिनविरोध









