तर परांश वॉरियर्स रत्नागिरी संघ उपविजेता
तीन राज्यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्र ठरला नंबर वन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले कॅम्प येथील वेंगुर्ला हायस्कुल नजीकच्या मैदानावर रोटरी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांच्या सहभागातील व्हॉलीबॉल स्पर्धेत बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाने सरळ दोन सेटमध्ये परांश वॉरियर्स रत्नागिरी संघावर २५x१७, २५x१८ अशा २-० अशा गुणांनी बाजी मारत १५ हजार रूपयासह चषकाचा विजेता ठरला. तर उपविजेता ठरलेला परांश वॉरियर्स रत्नागिरी संघ १० हजार रूपये व चषकाचा मानकरी ठरला.
वेंगुर्ले कॅम्प येथील वेंगुर्ला हायस्कुल नजीकच्या मैदानावर डिस्ट्रिक्ट ३१७० स्पोर्टस रायला अंतर्गत, रोटरी क्लब वेंगुर्ले मिडटाऊन, रोटरी क्लब बांदा, रोटरी क्लब कॅश्यु सिटी दोडामार्ग, सिंधुदुर्ग रोटरॅक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॉलीबॉलचे एन.आय.एस. कोच अतुल सावडावकर मार्गदर्शनाखाली रोटरी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सहभागातील व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते संपन्न झाले. यास्पर्धेत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यातील १६ संघ सहभागी झाले होते.
यास्पर्धेचा पहिला सेमी फायनलचा सामना परांश वॉरियर्स रत्नागिरी विरुद्ध जय मानसीश्वर वेंगुर्ला यांच्यात होऊन २१x१९, २१x१४ अशा २–० सेटने परांश वॉरियर्स रत्नागिरी संघ विजेता ठरला तर दुसरा सेमी फायनल बोथम वॉरियर्स वेंगुर्ला विरुध्द निपाणी बालवीर स्पोर्ट यांच्यात होऊन विजेता बोथम वॉरियर्स वेंगुर्ला याने २१x१०, १८x२१, १५x१० अशा २-१ सेट ने विजयी झाला. त्यामुळे अंतिम सामना बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ विरूध्द परांश वॉरियर्स रत्नागिरी यांच्यात होऊन २५x१७, २५x१८ अशा २-० अशा सेट ने बोथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ विजयी ठरला तर परांश वॉरियर्स रत्नागिरी संघ उपविजेता ठरला. यास्पर्धेत तृतीय क्रमांक निपाणी बालवीर स्पोर्टने तर चतुर्थ क्रमांक जय मानसीश्वर वेंगुर्ला या संघाने पटकाविला. तसेच या स्पर्धेत बेस्ट सेटर- इंद्रनीत मगदुम, बेस्ट अँटॅकर-सोहम मोरे, बेस्ट लिबेरो- स्वराज सावंत (परांश वारीयर्स वेंगुर्ला संघ), प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट- कौशिक शेलटकर (बॉथम वारीयर्स वेंगुर्ला) या स्पर्धेसाठी पंच म्हणून राज तोडणकर, स्वराज सावंत, अमित हर्डीकर, अजित जगदाळे, समालोजक म्हणून जयेश परब याने तर गुणलेखक म्हणून प्रा. हेमंत गावडे व चिन्मय तेरेखोलकर यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी व्हॉलीबॉल खेळ प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल नासिरभाई बोरसादवाला व व्हॉलीबॉल खेळाचे NIS कोच अतुल सावडावकर यांचेहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी रोटरीचे वेंगुर्ला प्रेसिडन्ट राजू वजराटकर, असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, संजय पुनाळेकर, इव्हेंट चेअरमन प्रथमेश नाईक, वेंगुर्ला सेक्रेटरी योगेश नाईक, ट्रेजरर पंकज शिरसाट, DRCC राज खलप, म्हापसा क्लब प्रेसिडन्ट सचिन मेनसे, DRR प्रांजल मराठे, DCC निशिता पेडणेकर, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, RDC स्पोर्टस सुनील रेडकर, रोटरीयन दिलीप गिरप, सचिन वालावलकर, नागेश गावडे, आनंद बोवलेकर, सुरेंद्र चव्हाण, मुकुल सातार्डेकर, अनमोल गिरप, आशुतोष मसुरकर, दोडामार्ग प्रेसिडन्ट दयानंद नाईक, सेक्रेटरी विठोबा पालयेकर, विवेकानंद नाईक, रोटरी क्लब बांदा प्रेसिडन्ट प्रमोद कामत, सेक्रेटरी नरसिंह काणेकर, ट्रेजरर शिवानंद भिडे, सिताराम गावडे, चार्टर प्रेसिडन्ट मंदार वालावलकर, नागेश गावडे, आनंद बोवलेकर, सुरेंद्र चव्हाण, मुकुल सातार्डेकर, अनमोल गिरप, आशुतोष मसुरकर, दोडामार्ग प्रेसिडन्ट दयानंद नाईक, सेक्रेटरी विठोबा पालयेकर, विवेकानंद नाईक, रोटरी क्लब बांदा प्रेसिडन्ट प्रमोद कामत, सेवे -टरी नरसिंह काणेकर, ट्रेजरर शिवानंद भिडे, सिताराम गावडे, चार्टर प्रेसिडन्ट मंदार कल्याणकर, मालवण रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अभय कदम, डॉ अजित लिमये, डॉ. लिना लिमये, सुहास ओरसकर, अभय कवटकर, अभिजित वणकुद्रे, हॉलीबॉल असोशिएशन झोनल सेक्रेटरी निलेश चमणकर, सावंतवाडी रोटरी क्लबचे पास्ट प्रेसिडेंट साईप्रसाद हवालदार, राजेश रेड्डीज, आनंद रासम, अनघा रमाणे, सुधीर नाईक, सद्गुरू खोजुवेकर, सचिन देशमुख, रोटरॅक्ट ZRR प्रितेश लाड, रोटरॅक्ट प्रेसिडेंट पल्लवी भोगटे, अक्षय मयेकर, भावेश भिसे, पृथ्वीराज चव्हाण, आदी प्रमुख रोटरी पदाधिकारी यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.
सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी हेमतं गावडे, सॅमसन फर्नांडीस, ग्ल्याडसन रॉड्रीक्स, निखिल शेलार, हर्ष शेटये, ललनकुमार, ओंकार रेडकर, जयेश परब, योगेश राणे, तुषार साळगांवकर, तसेच व्हॉलीबॉल कोल्हापूर झोनलचे सेक्रेटरी निलेश चमणकर यांनी परीश्रम घेतले.









