वृत्तसंस्था / ब्युनोस आयरीस
कोपा लिबरटेडोर्स चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी ब्राझीलचा बोटाफोगो आणि अॅटलेटिको मिनेरीयो यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. या अंतिम सामन्याला युरोपीयन फुटबॉल शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत बोटाफोगोने 13 गुणांची आघाडी घेवूनही त्यांना लिग स्पर्धेत प्रवेश मिळविता आला नाही. मात्र यावर्षी बोटाफोगो आपल्या कामगिरीत सातत्य राखत पहिल्यांदा अंतरखंडीय क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला 23 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस मिळणार असून पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत विजेत्याला थेट प्रवेश दिला जाणार आहे.









