काही वेळेला रात्रीचं जेवण बनवायला कंटाळा येतो.मग तेंव्हा पोळीभाजी करण्यापेक्षा मसाले भातला पसंती दिली जाते. पण तेच तेच मसाले भात, पुलाव,बिर्याणी खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी खानदेशी खिचडी हा उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ आहे.अगदी ½ तासात मस्त झणझणीत बेत तयार होतो. चला तर मग ही खिचडी कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
साहित्य
तांदूळ – १ कप
तूर डाळ – १/२ कप
लसूण – ७-८ पाकळ्या
आले – १ इंच
कोथिंबीर – २ tbsp
तेल – ४ tbsp
मोहरी
जिरे
हिंग १/४ tsp
कढीपत्ता
उभा चिरलेला कांदा २
शेंगदाणे २ tbsp
हळद १/२ tsp
मिरची पावडर १ tsp
काळा मसाला (खानदेशी मसाला ) २ tsp
बटाटा २ छोटे
पाणी अडीच कप (गरम करून )
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचसोबत आले लसूण ची पेस्ट करून घ्यावी. यांनतर कुकरमध्ये ४ चमचे तेल टाकून गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यांनतर त्यात जिरे मोहरी घालावी. जिरे मोहरी तडतडल्यानानंतर त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून भाजून घ्यावी.कांद्याला गुलाबी रंग आल्यांनतर त्यामध्ये कडीपत्ता,हळद ,चवीनुसार मीठ, लालतिखट,हिंग,कला मसाला शेंगदाणे, बटाटा हे सर्व पदार्थ घालून परतून घ्यावेत.वरील सर्व पदार्थ भाजून घेतल्यांनंतर त्यामध्ये तांदूळ आणि डाळ घालून परतवून घ्यावी. यानंतर त्यामध्ये लगेचच अडीच कप गरम पाणी घालावे.आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. सर्व मिश्रणाला एक उकळी आल्यांनतर त्यावर झाकण लावून कुकरच्या ३ शिट्ट्या करून घ्या. तयार झालेली गरमागरम खिचडी साजूक तूप,पापड किंवा लोणच्या सोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









