अव्वल मानांकित जोडीला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था / टोकियो
सोमवारी झालेल्या संघर्षपूर्ण उपांत्य सामन्यात भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याचा जपानी साथीदार ताकारु युझुकीने जपान ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली.
भारत-जपान वाईल्डकार्ड जोडीने उल्लेखनीय धाडस दाखवत हॅरिसन आणि किंग यांना रोमांचक लढतीत 4-6, 6-3, 18-16 असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर बोपण्णा आणि युझुकीने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि नंतर मॅरेथॉन सुपर टायब्रेकरमध्ये त्यांच्या तिसऱ्या मॅचपॉईंटवर सामना संपवून स्पर्धा जिंकली. 44 वर्षीय बोपण्णाने त्याच्या मोठ्या सर्व्हिसचा चांगला वापर केला तर युझुकीने उत्कृष्ट परतीचे फटके आणि नेट प्लेने प्रभावित केले. या विजयामुळे बोपण्णा आणखी एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. याआधी क्वीन्स क्लबमध्ये एटीपी 500 च्या क्वार्टलफायनलमध्ये पोहोचणे हा बोपण्णाचे 2025 मधील सर्वोत्तम प्रदर्शन होते.









