वृत्तसंस्था/ माद्रिद
शनिवारी येथे झालेल्या माद्रिद खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना व त्याचा साथिदार मॅथ्यू एब्डनने पुरुष दुहेरीचे उपविजेतेपद पटकाविले. रशियाच्या कॅचेनोव्ह आणि रुबलेव्ह यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळविले.
रशियाच्या कॅचेनोव्ह आणि रुबलेव्ह या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात रोहन बोपन्ना व मॅथ्यू एब्डन यांचा 6-3, 3-6, 10-3 असा पराभव केला. बोपन्ना आणि एबडेन यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. बोपन्ना आणि एब्डन यांनी 2023 च्या टेनिस हंगामात इंडियन्स वेल्स आणि कतार टेनिस स्पर्धेत दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले होते.









