वृत्तसंस्था/ अॅडलेड
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या अॅडलेड खुल्या आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी दुहेरीची अंतिम फेरी गाठली.
शुक्रवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य सामन्यात बोपण्णा आणि एब्डन यांनी गोंझालो इस्कोबार आणि निडोव्हेसोव यांचा 6-4, 6-4 असा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या स्पर्धेत आता पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत बोपण्णा आणि एब्डन यांची लढत राजीव राम आणि सॅलिसबेरी यांच्याबरोबर होणार आहे. राजीव राम आणि सॅलिसबेरी यांनी यापूर्वी तीनवेळा अमेरिका ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले आहे. अॅडलेड स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात राजीव राम आणि सॅलिसबेरी यांनी ह्युगो नेईस व झिलेन्स्की यांचा 7-6(7-4), 5-5, 10-6 असा पराभव केला.









