वृत्तसंस्था/ ट्युरीन (इटली)
2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनी पुरूष दुहेरीची उपांत्य फेरी गाठताना नेदरलँडचा कुलहॉफ आणि ब्रिटनचा स्कीपेस्की यांचा पराभव केला.
शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोपण्णा आणि एब्डन यांनी कुलहॉफ व स्कीपेस्की यांचा 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत रेड गटातून उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. रेड गटातून बोपण्णा-एब्डन तसेच राजीव रॅम आणि सॅलीसबेरी या जोडीनेही बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे.









