वृत्तसंस्था/ बिजिंग
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील चायना खुल्या 500 दर्जाच्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन साथीदार इव्हान डोडीग यांचे दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात अर्जेंटिनाचा सेरूनडोलो आणि चिलीचा जेरी यांनी बोपण्णा आणि डोडीग यांचा 7-5, 7-6 (7-5) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना दीड तास चालला होता. 44 वर्षीय बोपण्णाने 2024 च्या टेनिस हंगामात ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत तसेच मियामी टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत.









