10 हजार वर्षांनी पृथ्वीवर परतला
अंतराळ संशोधकांना आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात पहिल्यांदाच ‘बूमरँग’ उल्कापिंड मिळाला आहे. पृथ्वीपासून एक उल्कापिंड अंतराळात सोडण्यात आला होता, जो 10 हजार वर्षांनी पृथ्वीवर परतला असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. याचमुळे याला ‘बूमरँग मेटियोराइट’ म्हटले जात आहे.

या उल्कापिंडाला एनडब्ल्यूए 13188 नाव देण्यात आले आहे. फ्रान्सच्या ऐक्स-मार्सिले युनिव्हर्सिटीत यावर संशोधन झाले आहे. यात आमच्या ग्रहाशी निगडित वैशिष्ट्यो आढळून आली आहेत. संशोधनानुसार एनडब्ल्यूए 13188 पृथ्वीच्या क्रस्ट (पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात वरचा थर) आणि वॉल्कॅनिक रॉकने तयार झालेला आहे. यात काही असे घटक आढळून आले आहेत, जे केवळ अंतराळाच्या कॉस्मिक रेच्या संपर्कात आल्याने निर्माण होतात.
हा उल्कापिंड सुमारे 10 हजार वर्षांपूर्वी एका लघूग्रहाच्या प्रभावामुळे अंतराळात गेला होता असे संशोधकांचे मानणे आहे, या उल्कापिंडाचे वजन 600 ग्रॅम इतके आहे. काही वैज्ञानिक एनडब्ल्यूए 13188 ला उल्कापिंड मानत नाहीत. यात अॅल्युमिनियम युक्त खनिज प्लाजियोक्लेज आणि एका गडद रंगाचे खनिज पायरोक्सिन आहे. यामुळे हे स्पेस रॉक मेटियोराइट नसल्याचे या वैज्ञानिकांचे सांगणे आहे. याचमुळे यावरून वादविवाद सुरू आहे. तर उल्कापिंडात मिळालेले काही घटक लाइट फॉर्ममध्ये बदलले आहेत, हे केवळ रॉक अंतराळातील कॉस्मिक रेच्या संपर्कात आला तरच शक्य असल्याचे अन्य वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
एनडब्ल्यूए 13188 फ्यूजन क्रस्ट कोटिंग देखील मिळाले आहे. हे कोटिंग उल्कापिंड पृथ्वीच्या वायुमंडळातून जमिनीच्या दिशेने जात असताना तयार होते. याचमुळे आम्ही याला उल्कापिंड मानत आहोत असे संशोधक जेरोम गट्टासेका यांनी म्हटले आहे.









