नावनोंदणीसाठी आज अंतिम दिवस
प्रतिनिधी /फोंडा
ज्येष्ठ लेखिका स्व. माधवीताई देसाई यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून फोंडा येथील शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे शनिवार 9 जुलै रोजी माधवीताई देसाई यांच्या पुस्तकांचा परिचय ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा दुपारी 3.30 वा. पासून संस्थेच्या पै हाऊस सदर फोंडा येथील कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल.
स्पर्धकांना माधवीताई देसाई यांच्या कुठल्याही एका पुस्तकाचा परिचय करुन द्यावा लागेल. त्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा अवदी दिला जाईल. कुठल्याही वयोगटातील व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकते. मराठी, कोकणी किंवा हिंदी यापैकी कुठल्याही एका भाषेत पुस्तकाचा परिचय करुन देण्याची मुभा राहील. इच्छुक साहित्यप्रेमींनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 4 जुलैपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेनंतर बहुभाषिक काव्यसंमेलन होईल व त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. नावनोंदणीसाठी 8698389985 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे संस्थेच्या अध्यक्ष सुषमा तिळवे यांनी कळविले आहे.









