बेळगाव : बुलकच्या बैठकीत अवधुत डोंगरे अनुवादित ‘राजीव गांधी हत्या एक अंतर्गत कट’ या पुस्तकाचा परिचय अशोक ओऊळकर यांनी करून दिला. प्रारंभी बुलकचे दिवंगत सदस्य मोहन इजारे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. वक्त्यांचा परिचय किशोर काकडे यांनी करून दिला. य् ाानंतर अशोक ओऊळकर यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. राजीव गांधींचे खरे मारेकरी कोण? या प्रश्नावर हे पुस्तक प्रकाश टाकते. हत्येची पार्श्वभूमी, त्यादिवशी घडलेल्या घटना, स्फोट घडविणारे कोठे राहत होते, घटनास्थळाची परिस्थिती, चौकशी आयोगाने काढलेले निष्कर्ष, एलटीटीईचा यामध्ये हात होता का?, हत्येच्या आरोपाखाली जे पकडले गेले त्यांना शिक्षा झाली तेच खरे गुन्हेगार होते की आणखी कोणी? याविषयी या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
Previous Articleधोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी हटवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








