न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिराच्या वतीने सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक दयानंद गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण गेले दीड वर्ष विनामूल्य घेतले जात होते त्यातील दोन मुलीचे महाराष्ट्र पोलिसमध्ये नियुक्ती झाली असून या मुलींचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे .यावेळी येथील लहान मुलांसाठी सायंकाळी ४.३० वाजता पुस्तक प्रदर्शन होणार आहे तरी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे









