Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असेल. ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला.
हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके आरोप काय?
सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहारांच्या आरोपाखाली आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉंडरिंगचा आरोप ठेऊन ईडीकडे मुश्रीफांविरोधात तक्रार केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतरही मुश्रीफांनी चौकशीला जाणे टाळले होते. कोर्टात धाव घेऊन त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर कोर्टाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासाही दिला होता. पण आता कोर्टाने त्यांना धक्का देऊन त्यांच्या अटकेपासून संरक्षण काढून घेतल्याने एक मोठा धक्का दिला. दरम्यान आज हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 5 जूनपर्यंत तहकूब करण्यात आल्याने मुश्रीफ यांचे अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असणार आहे. मात्र
मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मुश्रीफ यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








