पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आलेल्या सनातन संस्थेचा सदस्य वैभव सुभाष राऊत याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथे चार ठिकाणी छापे टाकून क्रूड बॉम्ब आणि शस्त्रास्त्रे तसेच दारूगोळा यांचा मोठा साठा जप्त केल्यानंतर त्यांना त्याब्यात घेण्यात आले होते.
या घटनेची सुणावणी करताना न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने वैभव राऊत यांनी पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगाल्याने तसेच नजीकच्या काळात खटला पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे कारण देऊन जामिन मंजूर केला.
खंडपीठाने सांगितले की, खटला सुरू झाला असला तरी, फिर्यादीने तपासण्यासाठी मागितलेल्या ४१७ साक्षीदारांपैकी केवळ चार साक्षीदारांनी आतापर्यंत साक्ष दिली आहे. तसेच वैभव राऊतच्या तीन सहआरोपींना प्रदीर्घ तुरुंगवासाच्या कारणास्तव जामीन मंजूर झाला होता, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायालयाने राऊतला 50 हजार रूपयांच्या रकमेचा वैयक्तिक बाँड आणि त्याच रकमेतील एक सॉल्व्हेंट जामीन भरून घेऊन सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय मुंबई आणि वसई- विरार सोडण्यास मनाईदेखिल करण्यात आली आहे.








