नव दिल्ली :
दिल्लीतील काही शाळांना मंगळवारी बॉम्बची धमकी मिळाली आहे. चालू आठवड्यातील दुसरी तर मागील 9 दिवसांमधील अशाप्रकारची ही पाचवी घटना आहे. अग्निशमन दल, पोलिसांचे बॉम्बविरोधी पथक आणि श्वानपथकाने शोध घेतला असता काहीच संशयास्पद आढळून आलेले नाही. 13 डिसेंबर रोजी दिल्लीच्या 30 शाळांना धमकी मिळाली होती.









