कर्नाटक राजभवनात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यांनतर यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली.फोन कोणीकेला याबाबत अद्याप काही कळले नाही. फोन कॉल आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Previous Articleवन कायद्याचे उल्लंघन खपवून घेणार नाही : वनमंत्री राणे
Next Article सरकारने मान्य केलेल्या 39 खाण अटी पूर्ण करा









