वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशियन एअरलाईन्सच्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती ई-मेलद्वारे प्राप्त झाल्यानंतर रविवारी दिल्ली विमानतळावर खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी रविवारी बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या ई-मेलचा तपास सुरू केला. सदर ई-मेल ‘डायल जीएमआर फीडबॅक पोर्टल’वर आला होता. एरोफ्लॉट फ्लाईट एसयू-232 मध्ये सोडा पॅनमध्ये एक बॉम्ब ठेवण्यात आला असून त्याचा टायमरच्या सहाय्याने स्फोट घडवण्यात येईल, असे ई-मेलमध्ये नमूद आहे. एरोफ्लॉट ही रशियन विमान कंपनी आहे. त्याचे एसयू-232 हे विमान मॉस्को आणि दिल्ली या शहरांदरम्यान सेवा बजावते. या धमकीप्रकरणी दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत.








