गुवाहाटी
गुवाहाटी उच्च न्यायालयाला मंगळवारी सकाळी एका ईमेलच्या माध्यमातून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाली. या धमकीनंतर न्यायालय परिसरात सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. धमकीचा ईमेल मिळताच सुरक्षा दलांचे पथक त्वरित उच्च न्यायालयात पोहोचले, या तपासणीत काहीच संशयास्पद हाती लागलेले नाही. प्रारंभिक स्वरुपात ही धमकी अफवाच असल्याचे वात्टत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. मद्रास टायगर्स नावाच्या अज्ञात संघटनेकडून ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती.









