ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुंबईत येत्या दोन महिन्यात 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल, असा धमकी देणारा फोन पोलीस कंट्रोल रुमला आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीला मुंबई एटीएसच्या पथकाने मालाडमधून ताब्यात घेतले आहे.
माहीम, भेंडी बाजार आणि नागपाडा या मुंबईतील गजबलेल्या ठिकाणी पुढील दोन महिन्यात बॉम्बस्फोट होईल. त्यासाठी बाहेरच्या राज्यातून लोक आले आहेत. हा स्फोट घडविण्यामागे काँग्रेस आमदाराचा हात असल्याचेही फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. या फोनची तत्काळ दखल घेत एटीएसच्या पथकाने फोन लोकेशन ट्रेस केले. फोन करणाऱ्या व्यक्तीला मालाडमधून ताब्यात घेण्यात आले असून, सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
अधिक वाचा : …हे मोदींना शोभत नाही








