ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये नमाज पठण सुरू असताना मशिदीत बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 90 हून अधिक जखमी आहेत. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेशावरच्या पोलीस वसाहतीत असलेल्या मशिदीत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुस्लिम बांधव नमाज पठण करत होते. त्यावेळी अचानक बॉम्बस्फोट झाला. स्फोटानंतर मशिदीचं छत कोसळलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथकं घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ बाहेर काढत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या भीषण स्फोटात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून, 90 हून अधिक जण जखमी आहेत. त्यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : मविआच्या काळात पैसे घेऊन बदल्या? चंद्रकांत खैरेंच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल
दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. नमाज सुरु असताना हल्लेखोरानं स्वत:लाही बॉम्बनं उडवल्याची माहिती मिळते.









