वृत्तसंस्था/ भागलपूर
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाला आहे. हबीबपूर येथील शाहीगंज गावात झालेल्या या स्फोटात पाच मुले जखमी झाले आहेत. ही मुले गल्लीत खेळत असताना हा स्फोट झाला. या घटनेनंतर पूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सर्व जखमी मुलांना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले. तर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा घातपाताचा प्रयत्न होता का हे आता तपासले जात आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असून लवकरच स्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे या स्फोटामागे समाजकंटकांचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्फोटकांची हाताळणी करताना चुकून हा स्फोट झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.