कराची
भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी लागू झाली आहे. याचदरम्यान पाकिस्तानचा अशांत प्रांत बलुचिस्तानात बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात कमीतकमी 4 जण मारले गेले असून 20 जण जखमी झाले आहेत. बलुचिस्तानच्या किला अब्दुल्ला जिल्ह्यात हा स्फोट झाला. स्फोटानंतर अज्ञात हल्लेखोर आणि सुरक्षा रक्षकांदरम्यान गोळीबार देखील झाल्याचे समजते.









