सोशल मीडिया पोस्ट समोर : पोलिसांकडून कडक सुरक्षा तैनात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रमजान ईदच्या काळात दिल्ली आणि मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगलींचा इशारा देण्यात आला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. या इशाऱ्यानंतर मुंबईत पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी ईद दरम्यान काही भागात हिंदू-मुस्लीम दंगली, जाळपोळ आणि बॉम्बस्फोट होऊ शकतात, अशी पोस्ट व्हायरल होत असल्यामुळे सुरक्षा दलाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे. मुंबई पोलिसांना इशारा देणाऱ्या व्यक्तीने दिल्ली सरकारलाही सतर्क केले आहे. सदर पोस्टमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग केले. दिल्लीतील चांदणी चौक, जामा मशीद, जहांगीरपुरी येथे हिंदू-मुस्लीम दंगली किंवा बॉम्बस्फोट घडवू शकतात, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याव्यतिरिक्त मुंबई, नवी मुंबई आणि डोंगरी भागातील काही भागांचा उल्लेखही केला आहे.









