बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) रात्री उशिरा फोन करून त्याच्या पठाण (Pathaan) चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात राज्यात चालवलेल्या बायकॉट मोहिमेबद्दल चिंता व्यक्त केली असल्याची माहीती आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी दिली. त्यावर शाहरुख खानला ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान अशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खात्री मी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या ट्विटर (tweeter) अकांउंटवर पोस्ट करून माहीती देताना आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्वा म्हणाले, “बॉलिवूड (Bolllywood) अभिनेता शाहरूख खानने मला कॉल केला आणि आज पहाटे 2 वाजता आम्ही फोनवरून बोललो. शाहरूख खान यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. मी त्यांना आश्वासन दिले आहे की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. आम्ही योग्य चौकशी करू आणि अशी कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची खात्री सरकार करेल,” असे ते पुढे म्हणाले.
आसाममधील नारेंगी (Narengi) येथे शुक्रवारी हिंदुत्ववादी संघटनेच्या सदस्यांनी सिनेमागृहात घुसून तोडफोड करून नासधूस करून ‘पठाण’चे पोस्टर जाळले. ‘पठाण’ चित्रपटाला झालेल्या विरोधाबद्दल मुख्यमंत्री सरमा यांनी “शाहरुख खान कोण आहे? आम्ही त्याची काळजी का करावी? आमच्याकडे आधीपासूनच अनेक शाहरुख खान आहेत? मी ‘पठाण’ नावाच्या कोणत्याही चित्रपटाबद्दल ऐकले नसून माझ्याकडे त्यासाठी वेळही नाही.” अशी प्रतिक्रिया दिली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








