Bollywood Actress Tabu; बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बुचा भोला या चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान (Bhola Movie Set) अपघात झाला आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. शुटींगच्या वेळी स्टंट (Ajay Devgn) करताना तिला अपघात झाला त्यात तिला दुखापत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बुच्या डोक्याला आणि डोळ्याला दुखापत झाली आहे. अजय देवगणच्या या चित्रपटामध्ये तब्बु ही एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. (Bollywood Movies)
मिळालेल्या माहितीनुसार, शुटींगच्या दरम्यान एका घनदाट जंगलातून तब्बु ट्रक चालवत होती. काही चोर तिचा पाठलाग करत होते. त्या दरम्यान एका चोराच्या दुचाकीचा धक्का ट्रकला लागला. यावेळी तब्बुला गाडी आवरणं कठीण झालं. त्यात ट्रकची काच फुटून तिला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात तब्बुच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.सुदैवानं मोठा अपघात झाला नसून तब्बुला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. आता ती सुखरुप असल्याचे सांगितले गेले आहे.
अजय देवगण सोबत अनेक चित्रपटात तिने काम केलं आहे. ‘विजयपथ’ या चित्रपटातील तिच्या भुमिकेने तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ‘रुक-रुक अरे बाबा रूक’ हे गाने आजही अनेकजण एेकतात.
आपल्या हटक्या आणि प्रभावी अभिनयामुळे तब्बुनं बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. आजवर तिनं वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करुन लोकप्रियता मिळवली आहे. यापूर्वी देखील अजय देवगणच्या अनेक चित्रपटांमध्ये तब्बुनं महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ती त्याच्या भोला नावाच्या चित्रपटामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









