Kangana Ranaut Will Contest Election : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये ठसा उमटवल्यानंतर कंगना आता राजकारणात प्रवेश करणार असल्याची मोठी घोषणा कंगनाने केली आहे.अलिकडे एका कार्यक्रमामध्ये कंगना रनौतने म्हटलं आहे की, तिला निवडणूक लढवून जनतेची सेवा करायची आहे. हिमाचल प्रदेश पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने आपल्या गावी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कंगनाला भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवायची आहे.
हिमाचल हे कंगनाचे मूळ गाव आहे. हिमाचल प्रदेशात निवडणुका होणार आहेत. याच दरम्यान कंगनाने हिमाचल प्रदेशमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या कंगनाने सांगितलं की, जनतेची इच्छा असेल आणि भाजपने तिला तिकीट दिलं तर ती निवडणूक लढवण्यास तयार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









