वृत्तसंस्था/ सँटियागो
एटीपी टूरवरील येथे झालेल्या चिली खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू ऋत्विक बोलीपल्ली आणि त्याचा कोलंबीयन साथिदार निकोलास बॅरेनटोस यांनी पुरुष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात बोलीपल्ली आणि बॅरेनटोस यांनी अर्जेटिनाच्या गोंझालेझ व मोल्टेनि यांचा पराभव केला.
पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात बिगर मानांकित जोडी बोलीपल्ली आणि बॅरेनटोस यांनी टॉप सिडेड जोडी गोंझालेझ व मॉल्टेनि यांचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 70 मिनिटे चालला होता. या सामन्यात बोलीपल्ली आणि बॅरेनटोस यांनी 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली.









