महागाईच्या या दिवसात टोमॅटोचे दर जणू चटके देत असतानाच, २ टन टोमॅटोने भरलेले चक्क बोलेरो मालवाहू वाहनच पळविल्याची घटना समोर आली आहे.
ही घटना बेंगळूरच्या आरएमसी यार्डमध्ये घडली आहे. एका शेतकऱ्याने चित्रदुर्ग ते आरएमसी यार्डला टोमॅटो आणले होते. चहा पिण्यासाठी मालवाहू बोलेरोतून बाहेर पडले असता भामट्याने त्या वाहनासह २ टन टोमॉटो घेऊन रफ़ू चक्कर झाला आहे. या प्रकरणाची नोंद आरएमसी यार्ड पोलीस स्थानकात झाली आहे.









