४ जण गंभीर जखमी : बोलेरो चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी/प्रतिनिधी
कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील देवरूख मेढे येथे बोलेरो पीकअप उलटून ९ जण जखमी झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास घडली.यावेळी चालकासह ८ जण जखमी झाले आहेत. यापैकी ४ जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा सोनु बेलकर (दाभोळे, बेलकरवाडी ता. संगमेश्वर) हा आपल्या ताब्यातील बोलेरो गाडी घेऊन कोंडगाव, वाणीवाडी येथील हॉटेल साई पार्क येथुन जेवन करुन परत गावी दाभोळे येथे रत्नागिरी कोल्हापुर रोडने जात असताना कृष्णा सोनु बेलकर यांचा बोलेरो पिकअप गाडी (क्रमांक एम.एच.०८ डब्ल्यु ५०९५) मेढे बस स्टॉपच्या पुढील वळणावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थीतीकडे लक्ष न दिल्याने तसेच वळनाचा रस्ता असुनही त्याकडे लक्ष न देता, हयगयीने अविचाराने, बेदरकारपणे अतिवेगात गाडी चालवल्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला उजवे बाजुला जावुन बोलेरो पीकअप उलटली. या अपघातामध्ये गाडीमध्ये बसलेल्या दिपक कृष्णा बेलकर, सचिन शांताराम बेलकर, विनायक गणपत आंबेकर, सुरज आंबेकर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच प्रितेश चंद्रकात बेलकर, गणेश गंगाराम चव्हाण, सुमीत सखाराम आंबेकर यांना किरकोळ दुखापती झाल्या.
या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबतची फिर्याद साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील राहुल सर्जेराव गायकवाड – पोलीस हेड कॉन्स्टेबल १२३२ यांनी दिली.या प्रकरणी भा.द.वि.का.क.२७९,३३७,३३८ मो.वा.का. क. १८४,६६/१९२ (अ) अंतर्गत देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.









