वृत्तसंस्था/ दावणगिरी
येथे झालेल्या आयटीएफ दावणगिरी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत द्वितीय मानांकित बोगडेन बोब्रोव्हने अमेरिकेच्या टॉप सिडेड निक चॅपेलचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
रविवारी येथे झालेल्या एकेरीच्या अंतिम सामन्यात बोब्रोव्हने चॅपेलचा 6-3, 7-6 (7-4) असा पराभव करत विजेतेपद मिळविले तसेच त्याने 15 एटीपी गुण आणि 2160 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. बोब्रोव्हने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील आयटीएफचे सहावे विजेतेपद मिळविले आहे.









